शिरूर लोकसभा मतदार संघात ५९.४६टक्के मतदान

1083

मल्हार न्यूज,

अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात मतदार राजाने ५९.४६ टक्के मतदान करून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तुल्यबळ उमेदवार आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने या मतदार संघात चुरशीची लढत पहायला मिळेल. तर जाणकारांच्या मते यंदाही आढळराव पाटील विजयी होतील , तर नवमतदारांच्या मते अमोल कोल्हे बाजी मारून इथे इतिहास घडवतील पण निकाल २३मे ला लागणार असून त्यावेळी खरे चित्र पहायला मिळेल.

   शिरूर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. यामध्ये जुन्नर विधान्साभा, आंबेगाव, खेड आळंदी, शिरूर विधानसभा, भोसरी विधानसभा, आणि हडपसर विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.आता आपण विधानसभा प्रमाणे पुरुष, महिला आणि एकून मतदाराची टक्केवारी पाहूयात.

  • जुन्नर विधानसभा मतदार संघात एकूण मतदार आहेत :- २९८८४८

यामध्ये पुरुष मतदारांनी १०४८७२ मतदान केले तर  ८९०९३ महिलांनी मतदान केले असून एकूण १९३९६५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून जुन्नर विधानसभा मतदार संघात ६४.९० टक्के मतदान झाले आहे.

 

२) आंबेगाव विधानसभा मतदार संघात २८०३३४ मतदार आहेत

यामध्ये १०६७३५ पुरुष मतदारांनी मतदान केले तर ९०३१७ महिलांनी मतदान केले आहे. एकूण या मतदार संघात पुरुष आणि महिला मतदार मिळून १९७०५२ मतदान झाले आहे. या आंबेगाव विधानसभा मतदार संघाची टक्केवारी आहे ७०.२९ टक्के.

 

  • खेड आळंदी विधानसभा मतदार संघात ३२३०५१ मतदार आहेत.

यामध्ये ११३७२५ पुरुष मतदारांनी मतदान केले तर ८९०१५ महिला मतदारांनी मतदान केले आहे. या मतदार संघात पुरुष आणि महिला मतदार मिळून २०२७४० मतदान झाले आहे. या खेड आळंदी विधानसभा मतदार संघाची टक्केवारी आहे ६७.७६ टक्के.

 

  • शिरूर विधानसभा मतदार संघात ३६९८७२ मतदार आहेत.

यामध्ये १२७३७० पुरुष मतदारांनी मतदान केले तर १००१७० महिला मतदारांनी मतदान केले आहे. या मतदार संघात पुरुष आणि महिला मतदार मिळून २२७५४१ मतदान झाले आहे. या शिरूर विधानसभा मतदार संघाची टक्केवारी आहे ६१.५२ टक्के.

 

  • भोसरी विधानसभा मतदार संघात ४१३६८० मतदार आहेत.

यामध्ये १३५५३९ पुरुष मतदारांनी मतदान केले तर १०२२२३ महिला मतदारांनी मतदान केले आहे. या मतदार संघात पुरुष आणि महिला मतदार मिळून २३७७६७ मतदान झाले आहे. या भोसरी विधानसभा मतदार संघाची टक्केवारी आहे ५७.४८ टक्के.

 

  • हडपसर विधानसभा मतदार संघात एकूण ४८७६९९ मतदार आहेत.

यामध्ये १२९८७४ पुरुष मतदारांनी मतदान केले तर १०३४४२ महिला मतदारांनी मतदान केले आहे. या मतदार संघात पुरुष आणि महिला मतदार मिळून २३३३१६ मतदान झाले आहे. या हडपसर विधानसभा मतदार संघाची टक्केवारी आहे ४७.८४ टक्के.

 असे सर्व विधानसभा मतदार संघात म्हणजेच शिरूर लोकसभा मतदार संघात एकूण ७१८११५  पुरुष मतदारांनी मतदान केले तर ५७४२६० महिलांनी मतदान केले आहे. असे सर्व मिळून एकूण शिरूर लोकसभा मतदार संघात १२९२३८१ जणांनी मतदान केले आहे.  शिरूर लोकसभा मतदानाची टक्केवारी आहे ५९.४६ टक्के 

 

        मल्हार न्यूज