Monday, May 12, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन;-पालकमंत्री पाटील

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन;-पालकमंत्री पाटील

  मल्हार न्यूज,पुणे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) यापरिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे.’रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणारअसल्याचे मत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी  व्यक्त केले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची(पीएमआरडीए) बैठक  आज पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात झाली. यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप,आ.बाबुराव पाचरणे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त  विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे मेट्रोसोबतच, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी’पीएमआरडीए’ने ‘रिंगरोड’चे काम हाती घेतले आहे.मुंबई आणि पुणे महानगर यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ ‘पीएमआरडीए ‘हायपर लूप’ याआधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे कमी  होणार आहे, या प्रकल्पांची कामे विहित कालावपधीत पुर्ण करणे आवश्यक असल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेली विविध विकासकामे व प्रकल्पाबाबत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाही आढावा
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक आज आकुर्डी येथील कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबध्द व सर्वांगिण विकास आदी  विषयाबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे,आ. महेश लांडगे, ,
आ. लक्ष्मण जगताप, आ.बाबुराव पाचरणे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त  विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत अध्यक्ष खाडे यांनी तर प्रकल्पांच्या स्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी सविस्तर माहिती. प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत पालकमंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!