समाज मन घडवण्याचे काम हे संत विचारानेच होऊ शकते ;भानुप्रताप बर्गे

1105

पुणे प्रतिनिधी,

वारकरी सेवा संघ मध्य मातून कोंढवा बुद्रुक व परिसरात शालेय स्तरावर चित्रकला,निबंध लेखन, व उतारा वाचन लेखन स्पर्धा आयोजित केली होती यात शालेय विद्यार्थी नी उस्पूर्थ सहभाग नोंदविला यात सुमारे 4500 मुलांनी व मुलींनी सहभाग नोंदविला यात 15 शाळांनी सहभागी होत्या यात शाळेचे मुख्यदायपक शिक्षक यांनी उत्तम असे सहकार्य केले. एकूण 167 विद्यार्थी चार गटातून विजेत झाले त्या ना रोख बक्षीस व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले
वारकरी सेवा संघ हा संत साहित्या चा प्रचार व प्रसार करते त्याच बरोबर काही महिना वारकरी यांचा औषधे दर महिना मोफत देण्याचा उपक्रम चालू आहे तसेच सर्व संत पुण्यतिथी सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित साजरी करावी हा ही उपक्रम गेली 5 वर्ष चालू आहे अशी माहिती किशोर कामठे यांनी दिली
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भानुप्रताप बर्गे राजाभाऊ चोपदार माधवी निगडे,नरहरी महाराज नगरसेविका,संगीता ठोसर हेमंत निखळ. पुणे जिल्हा अध्यक्ष मोहन शिंदे व मुळशी तालुका,पुरंदर तालुका भोर वेल्हा येथील वारकरी सेवा संघ चे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते सूत्रसंचालन रमेश बगमर व दशरथ वाहले यांनी केले तर आभार अनंता देशमुख यांनी मानले