उपजिल्हा रूग्णालयातील सहायक अधीक्षक व कनिष्ठ लिपीकाला लाच घेताना रंगेहात पकडले

670

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

शिरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयातील सहायक अधीक्षक व कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी अटक केली असून सातव्या वेतन आयोगाचा फरक मंजूर करून देण्यासाठी 65 हजार रूपयांची लाच मगितल्याने ही कारवाई करण्यात आली आहे शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेले सहायक अधीक्षक गोपाळ पितांबर राणे व कनिष्ठ लिपिक गणेश श्याम माळवे या दोघा संशयितांना आज धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्याना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचुन शिरपूर उपजिल्हा रूग्णालय येथे कारवाई करत ताब्यात घेतले तक्रारदाराकडे अधीक्षक गोपाळ राणे व लिपिक गणेश माळवे यांनी सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढुन देण्यासाठी एकूण रकमेच्या दहा टक्के म्हणून 65 हजार रुपयांची लाच मागितली होती दि22 ऑगस्टला याबाबत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती आज या विभागाच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात सापळा रचला त्यात रुग्णालय अधीक्षकांच्या कक्षात रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले एसीबीचे नाशिक विभाग अधीक्षक सुनील कडासने,अप्पर अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे,निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, संदीप सरग,सुधीर सोनवणे आदींनी ही कारवाई केली.