लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलिसास तीन वर्षे सक्तमजुरी

817

पुणे प्रतिनिधी:-

अहमदनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस हेड कॉस्ट.ज्ञानदेव बन्सीलाल वाघमारे नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन यांना लाच स्वीकारताना 2017 ला रंगेहात पकडले होते. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.

आज या केसचा निकाल आज लागला असून मा विशेष सत्र न्यायाधीश साहेब, अहमदनगर यांनी आज दिनांक 21/09/2019 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 नुसार 3 वर्षे सक्तमजुरी व 1000-/ दंड न भरल्यास 15 दिवस आधी कैद व कलम 13 (1)(ड) व 13 (2) नुसार 3 वर्षे सक्तमजुरी व 1000-/ दंड न भरल्यास 15 दिवस आधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे.