पुणे प्रतिनिधी :-
“दांडिया फियास्ट” च्या वतीने आयोजित केलेल्या रास दांडियाला दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिहीर कोटकर यांनी यश लॉन्स येथे आयोजित केलेल्या रास दांडियाला महिलां, युवा वर्ग तसेच अबाल वृद्धांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन प्रतिसाद दिला आहे तसेच पुणेकरांची मने जिकंली आहेत.
“दांडिया फियास्ट”च्या वतीने आयोजित रास दांडियाचे हे वर्ष तिसरे असून महिला आपल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी तसेच एकत्रित येऊन या रास दांडियाचा याठिकाणी आनंद घेत आहे सध्या सगळीकडेच दांडियाचे धूम असून आणि दिवाळीही याच महिन्यात असून तसेच विधानसभा ही याच महिन्यात असल्याने सगळीकडे वातावरणात एकच आनंदच आहे. मिहीर कोटकर यांनी या ठिकाणी अगदी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती, तसेच ते स्वत: आणि त्यांची टीम यावर जातीने लक्ष ठेवून होते. प्रसिद्ध डीजे शिल्पी शर्मा यांनी लावलेल्या एकापेक्षा एक गाण्यावर आणि गरबा वर नागरिकांनी ठेका धरला होता. या कार्यक्रमाचे प्रायोजकाचे काम आशापुरी डेव्हलपर्स यांनी पाहिले,तर फिल्डक्राफ्ट एंटरटेनमेंट च्या संदेश देशमुख यांनी मार्गदर्शनाचे काम पाहिले.