वाघोली येथे “विबग्योर रूट्स अँड राईज” या नवीन शाळेचे उद्घाटन

922

पुणे प्रतिनिधी,

शाळांमधील अग्रगण्य असलेल्या विबग्योर ग्रुप ऑफ स्कूलने येणाऱ्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे आणि या पिढीची योग्यरीत्या निर्मिती व्हावी, यासाठी पुणे येथील वाघोली येथे आपल्या नवीन शाळेचे उद्घाटन केले. पुण्यातील या भागातील वाढते आयटी क्षेत्र बघता ही शाळा व्हीटीपी पूर्वांचल, वाघोली-केसनंद-वाडेगाव रोडवर सुरु करण्यात आली आहे. सध्या विबग्योरच्या पुण्यात एकूण ९ ठिकाणी शाळा आहेत.

सध्या ९०० हून अधिक शिक्षक व शैक्षणिक सुविधाकर्त्याच्या मदतीने विबग्योर ग्रुप शहरभरातील १०,४५० हून अधिक मुलांना शैक्षणिक सेवा पुरवित आहे. नवीन सुरू केलेली शाळा २५०० उज्ज्वल मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्यास सक्षम करेल. सुरुवातीला, ही शाळा पूर्व-प्राथमिक म्हणजेच श्रेणी 5 पर्यंत असेल.

“आशिया-पॅसिफिक विभागातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. वाढत्या आयटी हब तसेच स्टार्ट-अप हबमुळे या शहरात शिक्षित पालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा पालकांना आपल्या पाल्यासाठी सर्वोत्तम शैक्षणिक पर्यावरण प्रदान करण्याची इच्छा असते. विबग्योर येथे आम्ही शैक्षणिक, क्रीडा, परफॉर्मिंग आर्ट्स, समुदाय आणि अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांचे अखंड मिश्रण यावर जोर देतो. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, कलात्मक, क्रीडाविषयक आणि नैतिकदृष्ट्या विकास होण्याचे वातावरण देऊन विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास व्हावा व त्यांचे दर्जेदार व्यक्तिमत्व घडावे यासाठी विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल नेहमीच तत्पर असते. वाघोलीत आता आमच्या येण्यामुळे आम्ही अधिक मुलांना सुरक्षित वातावरणात दर्जेदार शिक्षण देऊ शकू ज्यामुळे तरुणांच्या मनाला प्रज्वलित करण्यास मदत होईल आणि त्यांना नवीन जगासाठी तयार केले जाईल. ”, असे प्रतिपादन कविता सहाय, व्हाईस चेअरपर्सन विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल यांनी केले.

शैक्षणिक क्षेत्रात या समूहाची प्रतिष्ठा चांगली आहे आणि वर्षानुवर्षे त्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत ज्यात भारतातील सर्वाधिक ब्रांड्स २०१८-१९ (एशियावन) आणि भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध ब्रँड २०१९ ((व्हाईट पेज इंटरनॅशनल) पुरस्कार आहेत.

विबग्योर रूट्स आणि राईज मधील शिक्षण प्रतिष्ठित सीबीएसई बोर्डाच्या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देणार आहेत. फिटनेस ते खेळ, स्केटिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, ज्युडो तसेच संगीत, नृत्य, स्पीच आणि नाटक यांचा समावेश अभ्यासक्रमात असेल. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे , प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी आणि सक्षम सहाय्यक कर्मचारीही उपस्थित असतील.