निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील

641

महेश भागीवंत , मावळ,

छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी प्रचारादरम्यान व्यक्त केले. आंदर मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे पारंपारिक पद्धतीने नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतामध्ये तरुण, महिला आणि मुले यांची संख्या मोठी होती आणि ठिकठिकाणी जल्लोषात घोषणा देत प्रचार करताना ते दिसत होते.

 मावळात होणारा पहिलाच प्रचार असा आहे कि ज्यामध्ये विरोधी पार्टीला जास्त महत्व न देता आपण करीत असलेल्या आणि पुढे करणार असणाऱ्या विकासकामांना जास्त महत्व दिले जात आहे अशी चर्चा मावळातील नागरिकांमध्ये होत आहे. टीका करण्यासाठी विरोधी पार्टी आहे आपण फक्त आपल्या विकासकामाला महत्व दिले पाहिजे. त्यामुळे बाळा भेगडे यांचे स्थान नागरिकांच्या मनात वाढू लागले आहे.

वाउंड, कचरेवाडी, देशमुखवाडी, घोणशेत, खरमरवस्ती, टाकवे बु, फळने, माऊ, वडेश्वर, नागथली, वाहनगाव, बोरवली, तळपेवाडी आदि गावांमध्ये स्वतः गावकऱ्यांनी भेगडे यांनी केलेल्या कामाची व गावातील नागरिकांना झालेल्या फायद्याची यादी वाचून दाखविली. गावातील लोकांना घरकुल योजना, बांधकाम कामगार योजना, विमा योजना अशा अनेक योजनांचा फायदा झाल्याने स्वतः गावकऱ्यांनी घेतलेल्या फायद्याचे कौतुक केले. त्यामुळे कोणी कितीही चुकीचा प्रचार केला तरी आमचे मत बाळा भेगडे यांनाच असा विश्वास गावकऱ्यांनी दिला. प्रचारादरम्यान आंदर मावळमध्ये सर्वत्र भाजपमय वातावरण झालेले होते. काही गावांमध्ये नागरिकांनी आपापसातील भेद मिटवुन आता आम्ही फक्त कमळ समोरील बटन दाबणार असा निर्धार करत पुन्हा भाजपच पाहिजे असा नारा दिला.