Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeक्रीडाएल्प्रो इंटरनॅशनल स्कुल तर्फे 'एल्प्रो स्पोर्ट फेस्ट' ची घोषणा

एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल तर्फे ‘एल्प्रो स्पोर्ट फेस्ट’ ची घोषणा

पुणे प्रतिनिधी,

हिवाळा म्हणजे संत्री, स्ट्रॉबेरी अँड गरम उबेत निजण्याचा महिना समजला जातो परंतु एल्प्रो शाळेचे विद्यार्थी मात्र या हिवाळ्यात ट्रेनिंग मध्ये व्यस्त असणार आहे कारण एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल तर्फे एल्प्रो स्पोर्ट फेस्ट चे आयोजन करण्यात आले आहे. दोन आठवडे चालणाऱ्या हा कार्यक्रमात विद्यार्थ्या खेळ गुणांना वाव मिळेल.
या क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीची सुरुवात ९ नोव्हेम्बर रोजी होणार आहे. या पहिल्या सत्रात शाळा अंतर्गत स्पर्धा होणार आहेत व त्या १६ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. २० नोव्हेंबर पासून या महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात होईल यामध्ये अंतर शालेय स्पर्धा घेण्यात येतील व त्या २४ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. या महोत्सवात क्रिकेट, फुटबॉल, बास्केट बॉल, थ्रो बॉल, टेबल टेनिस, तिरंदाजी, कॅरम, बुद्धीबळ आणि लाँग जंप इत्यादी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रम ध्यानचंद रूफटॉप मल्टी स्पोर्ट्स सुविधेमध्ये, शाळेच्या आवारातील 18,000 चौरस फूट क्रीडा क्षेत्र आणि इतर क्रीडा अनुकूल ठिकाणी आयोजित केले जातील.
‘एल्प्रो स्पोर्ट्स फेस्टिव्हल’ मध्ये जोरकस स्पर्धा होणार तसेच विद्यार्थ्यांना हा एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे. शारीरिक शिक्षण, व्यावसायिक क्रीडा व तंदुरुस्ती विकास व प्रशिक्षण संस्था असलेल्या मुंबई येथील स्पोर्ट्स गुरुकुल एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलला प्रत्येक खेळातील मैदानावरील तंत्रज्ञान व्यवस्थापित करण्यास मदत करणार आहे.
फेस्टविषयी बोलताना, एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्य डॉ. अमृता वोहरा म्हणतात, “एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंधी आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा सर्वांगीण अनुभव देण्याचा प्रयत्न करतो व त्यांना विविध संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देतो. खेळ ही एक गोष्ट आहे जी मला आणि माझ्या संघाला खूप प्रिय आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या खेळाच्या आवडींना पूरक अशा उत्कृष्ट पायाभूत सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या खेळासाठी आणि खेळाच्या निवडीसाठी एक व्यासपीठ देण्याची होती, जे त्यांना सर्वोत्कृष्ट करावे असे वाटते. हे त्यांचे शिक्षण भाग वाढवेल त्यांच्या विद्यार्थ्यांना भविष्यात आवश्यक असलेल्या कौशल्याने सुसज्ज करण्याच्या मूळ हेतूने मी या क्रीडा उत्सवाची अपेक्षा करते .”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!