Thursday, April 24, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेखडकीत घाणीचे साम्राज्य;नागरिक साथीच्या आजारांनी त्रस्त

खडकीत घाणीचे साम्राज्य;नागरिक साथीच्या आजारांनी त्रस्त

परिसर स्वच्छ करण्याची छावा मराठा संघटनेची मागणी

पिंपरी, प्रतिनिधी :
खडकीतील रेंजहिल परिसरात वन टाईप वसाहत, टू टाईप, सी टाईप, जे टाईप वसाहतीच्या भोवती प्रचंड गवत वाढल्याने या गवतामध्ये पाणी साठून राहून डासांचा मोठा उपद्रव झाला आहे. परिणामी नागरिक तापाने फणफणले असून, अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाली आहे. त्यामुळेे परिसराची स्वच्छता करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.      
      परतीच्या पावसामुळे गवत प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या गवतामध्ये पाणी साचले आहे. एवढेच नाही तर परिसरात कचरा कुंड्या नसल्याने नागरिक इमारतीच्या अवतीभवती शिळे अन्न व कचरा टाकत असल्याने उंदीर व घुसींनी हैदोस घातला आहे. कचरा गाडी येते. मात्र, ती थांबत नसल्याने नागरिक कचरा देण्यासाठी घरातून बाहेर येईपर्यंत कचरागाडी निघून जाते. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली येईपर्यंत वेळ लागतो. त्यामुळे कचरागाडी कचरा न घेताच जाते. त्यामुळे नागरिक कचरा इमारतीच्या पाठीमागे टाकतात. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, नागरिक तापाने हैराण झाले आहेत. त्यामुळे इमारतींच्या आसपास कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
        याच परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालय, रेंजहिल सेकंडरी स्कुल, रेंजहिल प्राथमिक शाळा, रेंजहिल इंग्लिश मिडीयम स्कुल या तिन्ही शाळेच्या भोवती गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरिकांनी मागणी करूनही गवत कापण्यात येत नाही. त्यातच डास झाले असल्याने विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थीही थंडी तापाने फणफणले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल, ऍम्युनेशन फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत असून, परिसरातील खासगी रुग्णालयातही डेंग्यू, मलेरियाची लागण झालेले रुग्ण उपचार घेत आहेत.          
      केवळ वाढलेल्या गवतामुळे डासांचा उपद्रव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढलेले गवत कापल्यास पाणी साचून राहणारे खड्डे दिसतील, पर्यायाने औषध फवारणी करून डासांचा नायनाट करता येईल. तसेच परिसरात ठराविक ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्यास नागरिक इतरत्र कचरा फेकणार नाहीत. त्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. 
           -रामभाऊ जाधव, पुणे जिल्हाप्रमुख, छावा मराठा संघटना
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!