कोंढव्यातील कुमार सुरक्षा इमारतीला भीषण आग

1292

भरत पारकर, कोंढवा

कोंढवा खुर्द मधील पारगे नगर येथे असलेल्या कुमार सुरक्षा इमारती मधील पाचव्या मजल्या वरील फ्लॅट क्र ५०३/५०४ मध्ये भीषण आग लागली असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आज संध्याकाळी सात ते सव्वासात च्या ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच गाड्यांच्या मदतीने जोरदार शर्थीचे प्रयत्न। करून त्वरित आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसून एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर फ्लॅट नंबर 503 हा पूर्ण जळून खाक झाला आहे, मोठे नुकसान झाले आहे. या फ्लॅट पंकज तिवारी यांच्या मालकीचा आहे.

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका नंदा लोणकर, नारायण लोणकर, मनसेचे नेते रोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण यांनी बचाव कार्यास मदत केली.

4