Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

पुणे,

दिनांक 25डिसेंबर 2019 रोजी ख्रिसमस नाताळ व 31 डिसेंबर 2019 रोजी वर्ष अखेर दिवस असे उत्सव साजरे होणार आहेत. जिल्हयात काही मागण्याकरिता विविध पक्ष व संघटनाकडून आंदोलने, रॅली, मार्चे रास्तारोको निदर्शने होत आहेत.उपरोक्त मुद्ये लक्षात घेता, पुणे ग्रामीण जिल्हयात वरील काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यसाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कलम 36 महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुणे ग्रामीण  जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी 00.10 वाजता पासुन ते दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी 24.00 वाजेपर्यंत, रस्त्यावरुन जाणा-या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी? याविषयी निर्देश देणे, मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याचे किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यांमध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्क्यावर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सर्व सार्वजनिक जागी सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व  इतर वाद्य वाजविणे  व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविणे याबाबत नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिका-यांनी हया अधिनियमांचे कलम 33, 35 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आदी अधिकार प्रदान केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!