पुणे प्रतिनिधी,
निधी फिल्म्स निर्मित ॲडव्हेंचेर किड्स येत्या जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता मनोज पालरेचा आहेत .या सिनेमात बाल कलाकार म्हणून निल बक्षी, निधी पालरेचा,आर्या पांढरे , क्रीश लाला,वेंदांत गरूड,सैशा साळसकर, दक्ष जैन यांनी भूमिका केल्या आहेत.
हा हिंदी चित्रपट स्काऊड आणि गाइड आधारित पहिला चित्रपट आहे.स्काऊड आणि गाईड मधील असलेले शिक्षण व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा चांगला परिणाम हे ह्या चित्रपटात दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे व पुण्याच्या परिसरात चित्रीकरण झाले आहे.अशा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून त्यात मनोरंजना सोबत शैक्षणिक व सामाजिक संदेश देण्यात आला आहे.
या चित्रपटाचे छायाचित्रकार राज ठाकूर, संगीत प्रमोद चिल्लळ,गीतकार सुधीर दिक्षित,पटकथा शैलेश आधारकर, जनार्धन गायकवाड, संकलन फिरोज देशमुख, पार्श्वसंगीत गौरव वाहाळ,कार्यकारी दिग्दर्शक सुवधान आंग्रे, रंगभूषा किरण दादा, गायक महमद सलामत यांनी केले आहे.
हा चित्रपट येत्या 3 जानेवारीला संपूर्ण भारतभर प्रदर्शीत होणार आहे .
अधिक माहितीसाठी संपर्क-9823030504