कंजारभट, भातु समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा व जातीचे दाखले द्यावेत

938

केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 
 
पुणे प्रतिनिधी
 
 
कंजारभट, भातु समाजाच्या स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच जातीचे दाखलेही उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले.
       सामाजिक न्याय, भटक्या विमुक्त जनजाती विकास कल्याण खात्याचे मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि कंजारभट, भातु समाजाच्यावतीने सिसोदिया यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन सिसोदिया यांना देण्यात आले. पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, राजेश बिरे, प्रदिप बिरे, गणेश पाटील, सागर बिरे, विकास हांडे, बालाजी बिरे, पुष्पेंद्र तोमर, प्रवीण बिरे, मयूर हांडे, रामकरण यादव आदी उपस्थित होते.
       पुणे शहर परिसरात कंजारभट, भातु समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नाही. याबरोबरच या समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखलेही नाहीत. या संदर्भात समाजाच्यावतीने केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत सिसोदिया यांनी या समाजाच्या मागण्या जाणून घेत, स्मशानभूमीसाठी जागा व जातीचे दाखले मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सिसोदिया यांनी बावधन, मंतरवाडी, महम्मदवाडी, हडपसर, उरुळी देवाची, फुरसुंगी, वडकी, लोणी काळभोर, कात्रज, कोंढवा, धनकवडी, वडगाव, नऱ्हे, वारजे माळवाडी, थेऊर आदी भागाचा दौरा करीत कंजारभट आणि भातु समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या. या सर्व गावांमध्ये या समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच या समाजाच्या नागरिकांकडे जातीचे दाखले नाहीत, ही बाबही या दरम्यान समोर आली.
        कृष्णचंद्र सिसोदिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करीत या कंजारभट, भातु समाजाच्या स्मशानभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच जातीचे दाखलेही उपलब्ध करून देण्यात यावेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश दिले.
         यावेळी पोलीस वेलफेअर असोसिएशनचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष प्रदीप बिरे, भाजप हवेली तालुका भ.वि.जा. अध्यक्ष सागर बिरे, आपला माणूस पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुनील मुदमे, आपला माणूस मित्र संघटनेचे हवेली तालुका उपाध्यक्ष रितेश बिरे, हांडेवाडीचे उपसरपंच  विकास हांडे, सुरेश बिनावत, प्रवीण कचरावत, संदेश काळभोर, प्रवीण मोडक, पुष्पेंद्र तोमर, रामकरण यादव, विशाल बिरे, मोहन बिरे, रणशिंग बिरे, सुरेश बिरे, सचिन बिरे, बालाजी बिरे, विकास हांडे, मयूर हांडे, विकी भाडळे, तुषार भांडवलकर, अजय बिरे, प्रकाश बिरे, नरबत बिरे, सचिन सिसोदिया, अजिंक्य बिरे, प्रवीण बिरे, मुकेश बिरे, निलेश बिरे, युवराज बिरे, नितीन शिंदे, जितमल पांचारिया आदी उपस्थित होते.