Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेकोरोनाग्रस्तांसाठी कृष्णा लोहोकरे यांची पाच लाखांची मदत

कोरोनाग्रस्तांसाठी कृष्णा लोहोकरे यांची पाच लाखांची मदत

कोंढवा प्रतिनिधी,

देश कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 216 झाला आहे तर देशात 1263 कोरोना ग्रस्त आहेत यामध्ये 269 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत आहे. अशावेळी कोरोना ग्रस्त नागरिकांसाठी मदत निधी देण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यानी व मुख्यमंत्र्यांनी केले होते.
त्यानुसार कोंढवा खुर्द येथील उद्योजक हरिकृपा उद्योग समूहाचे कृष्णा लोहोकरे यांनी प्रधानमंत्री रिलिफ फ़ंडाला पाच लाखांची मदत केली आहे.

कृष्णा लोहोकरे हे नेहमीच सामाजिक कार्यात मदत करत असतात, तसेच अडीअडचणीतील नागरिकांना पुढे होऊन मदत करत असतात. यावेळी त्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करून आपले हात स्वच्छ धुण्याचे तसेच अगदी महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला देशात कोरोना संपविण्याचे मोठे आव्हान असून ते आपण पूर्ण करू असे देखील ते यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!