आळंदीतील कोरोनामुक्त कर्मचा-याचे प्लाझ्मा दान प्रेरणादायी

477

अर्जुन मेदनकर,आळंदी 

येथील आळंदी नगरपरीषदे तील कोरोना मुक्त कर्मचारी मिथिल पाटील यांनी पिंपरीतील वाय.सी.एम. रुग्णालयात कोरोना पेशंट साठी आपला प्लाझ्मा देऊन एक इतरांना प्रेरणादायी कार्य केले आहे. यासाठी त्यांचे आरोग्यदायी सेवेच्या कार्यातुन इतरांनी प्रेरणा घेऊन कोरोना मुक्त नागरीकांनी आपला प्लाझ्मा दान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मिथिल पाटील यांचे कार्याचे आळंदी परीसरात कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील सेवा कार्यास शुभेच्छा देऊन कार्याची दखल घेतली. कोरोना या आजारातून ते नुकतेच बरे झाले आहेत त्यांनी प्लाझ्मा दान करुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.