पुरंदर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे येथील ॲड मयुर शंकरराव जगताप यांची राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्याच्या पुरंदर तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्य चे समन्वयक प्रवीण प्रधान यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. राज्य युवा परिषद ही सामाजिक चळवळीमध्ये युवकांच्या विकासासाठी कार्यरत असून राज्य युवा परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राज्य युवा धोरण राबविण्यासाठी व काळानुरूप युवा धोरणामध्ये बदल व्हावेत.सामाजिक या हेतूने युवा साथीच्या सक्रिय सहभागाने युवा मसुदा करण्याचे काम हाती घेत आहेत. राज्य युवा परिषदच्या माध्यमातून तालुक्यातील युवा वर्गासाठी विविध उपक्रम हाती घेणार असल्याचे ॲड जगताप यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल राज्य युवा परिषदचे संस्थापक अध्यक्ष नितेश थिगळे, निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड धनंजय भोईटे यांनी त्यांचे अभिनंदन केले . या वेळी पुरंदर मिल्क चे संचालक चंद्रशेखर जगताप , घेरा पुरंदरचे उपसरपंच ॲड सचिन कारकुड, आकाश शिळीमकर, ॲड सुमित पवार, ॲड प्रसाद भोसले,ॲड शिवाजी शेलार,पुरंदर युवक काँग्रेस सरचिटणीस गणेश हांडे, नायगाव सोसायटी सचिव सुमित बांदल,श्री सिद्धेश्वर व रिसे पिसे सोसायटीचे सचिव सोमनाथ चव्हाण,आदेश भुजबळ,हर्षल गरुड,प्रदीप हांडे आदी उपस्थित होते.