आकाश जाधव , पुणे प्रतिनिधी,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कला परिवार हडपसरने खाजगी दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या आया व घरकाम करणाऱ्या महिलांना सुरक्षा कवच म्हणून प्रत्येकी एक लाखाचा विमा पॉलिसी चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमाचा जवळ जवळ साठ महिलांनी लाभ घेतला. चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर हडपसर गाव येथे पवित्र वातावरणात हा कार्यक्रम पार पडला .
या कार्यक्रमासाठी माजी महापौर वैशाली ताई बनकर, नगरसेविका हेमलता ताई मगर, नगरसेविका उज्वलाताई जंगले, जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई कोद्रे,सुशीला गुंजाळ ,स्वाती चिटणीस, स्वाती टिळेकर ,हेमा लाळगे , मंदा शेडगे, शितल शिंदे, स्वाती सातव, शीतल चांदणे, हडपसर पोलीस चौकीच्या पी .आय .आर .आर .पाटील मॅडम ,संजय तात्या शिंदे ,जीवन बाप्पू जाधव, राजकुमार तिखे, अॅड. विजयकुमार काळे, हे मान्यवर उपस्थित होते
डॉ.अश्विनी शेंडे श्रुतिका चौधरी, योगेश गोंधळे,दिलीप मोरे सर संगीता बोराटे, डॉ. शंतनु जगदाळे ,रूपाली वांबुरे, आकाश जाधव, रौफ शेख ,अजय खंडागळे, श्रुतिका क्षिरसागर ,जयश्री चव्हाण, राजश्री कदम, प्रमोद अय्या, काजल माने, श्रीकृष्ण भिंगारे , प्रशांत नवले या कला परिवारच्या सदस्यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. अश्विनी शेंडे व श्रुतिका चौधरी यांची होती. प्रास्ताविक डॉ. अश्विनी शेंडे यांनी केले. हेमलताताई मगर ,वंदनाताई कोद्रे व माजी महापौर वैशाली ताई बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली वांबुरे यांनी केले .व आभार प्रदर्शन श्रुतिका चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगेश गोंधळे ,दिलीप मोरे सर ,आकाश जाधव यांनी मेहनत घेतली