अनिल चौधरी, पुणे
उंड्री येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश भिंताडे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून हडपसर येथील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठाण अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून, अन्नदान, बिस्किटे तसेच इतर वस्तूंचे वाटप करत आपला वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वाचा दिवस असतो. त्यामुळेच गरीब असो कि श्रीमंत वाढदिवस सगळेच साजरा करताना दिसतात. काही लोक या दिवशी धार्मिक अनुष्ठान करतात, तर काहीजण आपले मित्र आणि नातेवाइकांसोबत पार्टी करतात. मात्र वाढदिवसा दिवशी होणारा अनाठायी खर्च टाळून अनाथ मुलांबरोबर निलेश भिंताडे यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
नीलेश यांचा जन्म उंड्रीतील शेतकरी कुटुंबात झालेला आहे. त्यांना समाजसेवेची आवड आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांना गरिबांबद्दल खूप आस्था आहे. त्यामुळेच आपण समाजतील गोरगरीब आणि अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असतो. युवा पिढी वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च करत आहे. हा खर्च टाळून समाजतील दुर्लक्षित व अनाथ मुलांसाठी खर्च होणे गरजेचे आहे. अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून खरच खूप समाधान मिळत आहे, अनाथ मुलांना समजणे त्यांना आपलेसे करणे गरजेसे आहे. अशाच प्रकारे इतरांनी आपला वाढदिवस गोरगरीब व अपंग विद्यार्थ्यांसोबत साजरा केल्यास वाढदिवस सार्थकी लागेल अशी अपेक्षा भिंताडे यांनी व्यक्त केली. तर विध्यार्थ्यानी निलेश भिंताडे यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या व मदत केल्याबद्दल आभारही मानले. यापुढील काळात देखील आपण अनाथांसाठी योग्य ती मदत करणार असल्याचे निलेश भिंताडे यांनी सांगितले. याप्रसंगी तुषार भिंताडे, योगेश भिंताडे, शेखर भिंताडे, श्रीकांत भिंताडे, मंगेश पुणेकर आदी उपस्थित होते.