उंड्रीत महामानवाच्या 130व्या जयंती निमित्त राजेंद्र भिंताडे यांनी केले अभिवादन

423

कोंढवा प्रतिनिधी,

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. त्यांचं संपूर्ण जीवन मानवकल्याणासाठी होतं. समाजातून विषमता नष्ट व्हावी. समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी. प्रत्येकाला सन्मानानं, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला. उपेक्षित बांधवांना ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना त्यांनी आपल्या देशाला दिली . बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातंच समस्त देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे” अशा शब्दात राजेंद्र भिंताडे यांनी उंड्री मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साधेपणाने कोरोना विषाणू संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले होते.
याप्रसंगी सुभाष कदम, सिद्धार्थ कदम, प्रफुल कदम, धीरज शिंदे, प्रवीण गरुड, डॉ.शाहू, चंद्रशेखर हर्णे , संतोष गोरड आणि उंड्री ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी भिंताडे यांनी शासनाच्या वतीने लॉक डाऊन होत असल्याने नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडावे , सोशल डिस्टनचे पालन करावे, आपले हात वारंवार धुवावे , मास्कचा वापर करावा व शासन व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे काही अडचण असल्यास आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.