Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेपुण्यातील विक्रमवीर "दीपक बुंदेले" ह्यांची "वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद

पुण्यातील विक्रमवीर “दीपक बुंदेले” ह्यांची “वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद

पुणे प्रतिनिधी,

प्रसिध्द व्यक्ती ते ही वेगवेगळ्या क्षेत्रातील अर्थातच अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, गायक, संगीतकार, राजकारणातील व समाजकारणातील अश्या जवळपास १५०० व्यक्तीना प्रत्यक्ष भेटून त्याच्यासह छायाचित्राचा ८५०० फोटोचा संग्रह गेल्या १४ वर्षाच्या कालावधीत करून दीपक बुंदेले ह्यांनी ओ.एम. जी. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली त्यांना ओ.एम. जी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह (मेडल) देऊन गौरविण्यात आले या आधीही त्यांची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ही नोंद झाली होती.
त्याच्या ह्या छंदाचे तत्कालीन राष्ट्रपती ऐ.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी ही कौतुक केले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी दीपक बुंदेले ह्यांना ‘सन्मानपत्र’ देऊन खास गौरव केला.
दीपक बुंदेले ह्यांच्या अनेक वृत्तपत्रात तसेच टीव्ही, रेडिओ वर ही अनेक मुलाखती प्रसिध्द झाल्या आहेत त्याचबरोबर त्यांना “युवा-भारत पुरस्कार”, पत्र-मित्र पुरस्कार, भारत सरकारतर्फे सुवर्ण जयंती पदक असे अनेक पुरस्कार प्रदान झाले आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments