Wednesday, February 19, 2025
Google search engine
HomeMalhar Newsमनसेच्या दणक्याने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू

मनसेच्या दणक्याने संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू

मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या आंदोलनाला यश…..

गणेश जाधव, मुंबई प्रतिनिधी,

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गेली दोन-तीन दिवस मुंबई शहरात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे अशातच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचे पितळ उघडे पडले..
सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदीवली विधानसभेत जागोजागी पावसाचे पाणी साचले ,रस्त्या-रस्त्यावर जलाशयाची निर्मिती झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले अशातच साकीनाका जवळील सफेद पुल या ठिकाणी असलेला नाला मिठी नदीला लागून असल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा वाहत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

सफेद पुल या ठिकाणी असलेल्या नाल्याची संरक्षण भिंत काही दिवसांपूर्वी साफसफाई दरम्यान पडली असल्याबाबतची तक्रार मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी महानगरपालिकेकडे केली होती परंतु या तक्रारीचे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वेळ मारून नेली असा आरोप महेंद्र भानुशाली यांनी केला.परंतु स्थानिकांना होत असलेल्या त्रासाला लक्षात घेत महेंद्र भानुशाली यांनी संरक्षण भिंतीचा विषय लावून धरत भर पावसात बसून गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले..

या आंदोलनाचे फेसबुक लाईव्ह करताच साकीनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि संरक्षण भिंत नसल्यामुळे काही अपरिचित घटना होऊ नये याकरिता त्यांनी त्वरित बॅरिकेट्स उपलब्ध करून देत सर्वसामान्य जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले.

मनसेचे महेंद्र भानुशाली यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते (शाखाध्यक्ष वार्ड १६२) अशोक जाधव , सब्बन अली, इतर मनसे सैनिक आंदोलनात सहभागी होते. मनसेकडून केलेल्या आंदोलनाची दखल घेत काही कालांतराने महानगरपालिकेने त्वरित नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम सुरू करत स्थानिकांना काहीसा दिलासा देत स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.

एल वार्ड ,सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सुरू केलेल्या संरक्षण भिंतीच्या कामामुळे स्थानिक नागरिक महानगरपालिका अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस प्रशासनाचे आभार मानत आहेत..

मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी याप्रसंगी असे मत व्यक्त केले की,”आमचा पक्ष हा सर्वसामान्यांचा प्रश्न शासनदरबारी मांडणारा तसेच प्रश्न मार्गी लावणारा पक्ष आहे.. जर आंदोलन करूनच आम्हाला यश मिळणार असेल तर त्यासाठी मी सदैव तयार आहे”…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!