छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे चळवळ उभी करण्यासाठी मदत म्हणून ग्रामिण शेतकरी,मजुर महिलांनी दिली एक दिवसाची मजुरी
जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षण चळवळ निमित्त कोल्हापूर चे छत्रपती संभाजी महाराज हे मराठा जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गेले असता ग्रामीण भागातील शिवणकाम करणाऱ्या महिला, शेतकरी व आत्महत्याग्रस्त मायमाऊल्यांनी उन्हातान्हात काबाड कष्ट करून कमावलेली एक दिवसाची रोजंदारीची रक्कम जमा करून आज या चळवळीसाठी मदत म्हणून दिली.
”तुम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी लढता. आम्ही तुमच्या सोबत आहोत,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. लोकांच्या या भावना ऐकून माझ्यावर असलेल्या मोठ्या जबाबदारीची जाणीव होत आहे.
मिळालेली मदत अतिशय मोलाची आहे व आजपर्यंत अशा पध्दतीची मदत स्वीकारण्याचे मी कटाक्षाने टाळत असे, पण या सर्व माऊलींचा आशीर्वाद म्हणून ही मदत स्वीकारली. यापुढे कोणाकडून आर्थिक स्वरुपात मदत स्वीकारणार नसून, आपल्या सर्वांचे आशिर्वाद व प्रेमाच्या पाठबळावरच हा लढा यशस्वी करू असे वक्तव्य संभाजी महाराज यांनी केले.