कोंढवा प्रतिनिधी
उंड्रीतील भिंताडेनगर मधील नैसर्गिक ओढ्यात महावितरणचा उच्चदाब वाहिनीचा खांब आहे.या खांबाचे फुटिंग आणि खालील भागाची ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाने मोठी हानी झालेली असून तो केव्हांही कोसळू शकतो व मोठा अपघात होण्याची शक्यता आहे .याबाबत जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी वारंवार महावितरणशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील महावितरण दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येथे एखादा जीव जाण्याची प्रतीक्षा तर महावितरण करत नाही ना, असा प्रश्न भिंताडे तसेच स्थानिक नागरिक विचारत आहेत.
महावितरणच्या भोंगळ कारभार या निमिताने पुढे येत आहे. भिंताडेनगर हे पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत मोडले जात असून येथील मुख्य रस्त्यावरील कॉर्नर ला ओढा आहे. ओढ्यातच महावीतरणे उच्चदाब वाहिनीचा खांब गेल्या २५ वर्षांपूर्वी उभारला होता. त्यामुळे हा खांब आता जीर्ण झाला असून यांच्या खालील भागाचे फुटिंगची मोठ्या प्रमाणात हानी झालेली असून याची त्वरित दूरुस्ती करून भविष्यात होणारी मोठी दुर्घटना टाळता येईल असेही भिंताडे यांनी महावितरणला कळविले आहे, जर आठ दिवसात संबधित खांबांची दुरूस्ती झाली नाही तर मोठे जनआंदोलन केले जाईल आणि होणाऱ्या नुकसानीस महावितरण जबाबदार राहील असा इशारा भिंताडे यांनी दिला आहे. याप्रसंगी
दादा कड, अविनाश टकले, ओंकार होले, शशिकांत पुणेकर, अक्षय टकले, ईश्वर कामठे, संतोष गोरड,
श्रीकांत भिंताडे, तुषार भिंताडे, गणेश कानडे, विठ्ठल भिंताडे, आदी उपस्थित होते.