वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा गावडे यांच्या निवडीने ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह

717

वाघोली प्रतिनिधी– वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुरेखा सोपान गावडे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामपंचायतीचे तत्कालिन उपसरपंच मुकिंदा शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत सुरेखा सोपान गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होऊन आनंदोत्सव साजरा होत आहे.

वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या वस्त्यांना जोडणारे अनेक रस्ते वेळोवेळी स्वखर्चाने दुरुस्त करून नागरिकांना नेहमी मदतीचा हात पुढे करणारे म्हणून सोपान गावडे व सुरेखा गावडे दाम्पत्य परिचित आहे. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव, युवा उद्योजक रमेश हरगुडे पाटील यांच्या हस्ते उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सुरेखा गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक  कार्यकर्ते सोपान गावडे, उद्योजक रोहित गावडे उपस्थित होते.तर जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी निवडी बद्दल विशेष आभार मानले आहे.याप्रसंगी कोंढवा गावचे युवा कार्यकर्ते संतोष गोरड ,प्रशांत लोणकर, माऊली भोईटे सागर लोणकर, सौरभ चौधरी, शुभम लोणकर ,संदिप लोणकर, संजय लोणकर, गणेश दिक्षित उपस्थित होते