निर्धार सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदत

517

गिरीश भोपी, रायगड/ महाड/पनवेल

दिनांक ७ ऑगस्ट रोजी महाड येथे निर्धार सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या प्रमाणात 6 गावांना पुरेल एवढे किट (तांदूळ, गहू, साबण, मसाले, मेणबत्ती, तेल, कोलगेट, बिस्कीटे, पाणी बॉक्स, चटई, चादरी) बनवून संपूर्ण टीमच्या साहाय्याने पूरग्रस्त भागातील पारवाडी , वाकी , शिवाजीनगर , कचूले बौद्धवाडी व डोंगराळ भागात जिथे भुस्खलन होऊन रस्ते खचून गेल्याने अजून पर्यंत कोणतीही मदत मिळू शकली नव्हती अशा ठिकाणे नाण्याची वाडी, आंब्याची माळ , शौर्य वस्ती, गावठाण या वाड्यांवस्त्यांवर पोहचवण्याचे कार्य संस्थेने केले.

दिनांक ८ ऑगस्ट रोजी *झेंडा सामाजिक संस्था,एकनाथ प्रतिष्ठान ,निर्धार सामाजिक संस्थेने * चिपळूण मधली ५ पूरग्रस्त भागातील गावांमध्ये गरजेनुसार अन्नधान्याचे संपूर्ण किट बनवून पोहचविण्याचे कार्य यशस्वी पणे पार पाडले आहे.

अभिमान ह्या एकाच गोष्टीचा आहे आहे की आपण आपली मौल्यवान मदत योग्य त्या गरजू पर्यंत व्यवस्थित पोहचवू शकलो. दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीबद्दल  सर्वांचे आभार मानले आहे.