गिरीश भोपी, पनवेल
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वसामान्य महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शुभांगी झावरे पावडे यांनी माऊली फॉउंडेशन ची निर्मिती केली. संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी फॉउंडेशनची धुरा उचलली आहे व तळागाळातील महिलांना न्याय देण्याचे कार्य हाती घेतले आहे. याच पार्शवभूमीवर काल दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी कळंबोली येथे छोटेखाणी कार्यक्रम घेऊन माउली फॉउंडेशन चा उदघाटन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा रूपालीताई शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर कानसा वारणा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक दादा पाटील, क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई शिंदे, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका विद्याताई गायकवाड, शिवसेना वाहतूक महिला विभागाच्या
सौ.सुवर्णाताई वाळुंज, तनिष्क मार्फत महिलांना व्यासपीठ देणाऱ्या उषाताई, शिवसेनेचे कार्यकर्ते बाबाजी ढोमे, उद्योजक व्यावसायिक व जय हरी महिला मंडळाचे अध्यक्ष पोपट दादा आवारी, भाजप कार्यकर्ते खंडागळे सर,इतर जमलेल्या सर्व महिला भगिनी हजर होत्या.