साईश्री हॉस्पिटलमध्ये टीएमजे आर्थ्रोस्कोपीच्या उपचारांचे नवे युग

907

• जबड्याच्या दुखण्याला टेम्पोरोमंडीब्यूलर जॉइंटचे (टीएमजे) दुखणे म्हणतात

पुणे प्रतिनिधी

• नोकरी किंवा कामाच्या स्वरुपामुळे तसेच कामाशी संबंधित झालेल्या दुखापती आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत
जबड्याच्या दुखण्यामुळे एखाद्याला दैनंदिन कार्य करताना अडचणी येतात आणि त्यामुळे त्याच्या जीवनमानाचा दर्जा खालावतो” – डॉ पुष्कर वाकनीस, मॅक्सिलोफेशियल शल्यचिकित्सक जबड्याच्या दुखण्याला टेम्पोरोमंडीब्यूलर जॉइंटचे (टीएमजे) दुखणे म्हणतात. नोकरी किंवा कामाच्या स्वरुपामुळे तसेच कामाशी संबंधित झालेल्या दुखापती आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत.
४५ वर्ष वयाच्या सौ मनिषा चोरडिया यांना कित्येक महिन्यांपासून जबड्याचे दुखणे सतावत होते. जबडा उघडण्यातील या त्रासामुळे त्यांना कानाभोवती दुखणे, तोंड उघडताना किंवा बंद करताना विशेषतः सकाळच्या वेळेत त्रास होणे आणि जबडा हलताना आवाज होण्याचा त्रास त्यांना होत होता.
साईश्री हॉस्पिटल येथील डॉ पुष्कर पी वाकनीस आणि डॉ. गंधाली लिमये यांच्या मॅक्सिलोफेशियल सर्जरी टीमने सौ चौरडिया यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया केली. टीएमजे आर्थ्रोस्कोपी नावाची ही शस्त्रक्रिया साधारणपणे ४५ मिनिटे ते १ तास चालते. साईश्री हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेमुळे सौ चोरडिया आता त्यांचे दैनंदिन आयुष्य सामान्य पद्धतीने जगू शकत आहेत.
टेम्पोरोमंडिब्यूलर जॉइंट (टीएमजे) डिस्फंक्शन किंवा टेम्पोरोमंडिब्यूलर डिसऑर्डर (टीएमडी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुखण्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक लोकांपैकी एक म्हणजे सौ चोरडिया आहेत. मंडिब्लयूर मूव्हमेंट म्हणजे खालच्या जबड्याच्या हालचालींवर येणाऱ्या मर्यादा, चेहऱ्याचा असामान्य आकार, सांध्यांचे दुखणे आणि अन्य प्रकारचे त्रास रुग्णांना होत असतात.
“मला माझे तोंड उघडता येत नव्हते आणि जेवण्याची क्रिया ही वेदनादायी बनली होती. त्यामुळे माझ्या आहाराच्या सवयी बदलाव्या लागल्या होत्या आणि माझे आरोग्य खालावत चालले होते. शस्त्रक्रियेनंतर मी मला पाहिजे ते खाऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जाॅ आर्थ्रोस्कोपीने मला नवे आयुष्य दिले आहे त्यामुळे मी आनंदात आहे. जबड्याच्या दुखण्यामुळे माझ्या आयुष्यावर खूपच नकारात्मक परिणाम झाला होता. दैनंदिन आयुष्यातील साध्या साध्या गोष्टी जसे की दात घासण्यासाठी किंवा जेवणासाठी तोंड उघडण्याची क्रियाही मला करता येत नव्हती. पण आता शस्त्रक्रियेनंतर माझे जबड्याचे दुखणे तर गायब झालेच आहे पण मी माझे तोंड सामान्य पद्धतीने उघडू शकते,” असा अनुभव शस्त्रक्रियेमुळे बऱ्या झालेल्या व आनंदात असलेल्या रुग्णाने सांगितला.
डॉ. पुष्कर वाकनीस, एमडीएस, एफआयबीओएमएस, एमएफडीएस आरसीपीएस (ग्लासगो) युके, प्रोफेसर आणि साईश्री हॉस्पिटलमधील ओरल व मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख, म्हणालेः “आपल्या चेहऱ्याचा एक छोटा परंतु महत्त्वाचा असलेला सांधा म्हणजे टीएमजे नावाचा जॉईंट त्याचे कार्य असामान्य पद्धतीने होणे म्हणजे टीएमजे इंटरनल डिरेंजमेंट. टीएमजे आर्थ्रोस्कोपी ही मिनिमल इन्व्हेसिव्ह प्रकारची शस्त्रक्रिया असून त्या अंतर्गत जॉईंट मध्ये एक छोटा कॅमेरा सोडला जातो आणि तो जॉईंट साफ केला जातो तसेच कार्टिलेजसंबंधी म्हणजे सांध्याच्या टोकाला असलेल्या समस्या सोडवल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होते आणि कोणत्याही वेदनेशिवाय ते आपले दैनंदिन कार्य करू शकतात. मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया असल्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी खूप कमी प्रकारचा छेद घेतला जातो आणि त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची खूण दिसत नाही. शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश हा वेदनारहित पद्धतीने तोंड उघडण्याचे कार्य व त्यासंबंधीची क्रिया पूर्ववत होणे हा असतो.”
“सांध्याचा आकार हा सुमारे २५ मिलिमिटर एवढाच असतो म्हणजे साधारणतः तुमच्या अंगठ्याच्या नखा एवढा. एवढ्या कमी जागेमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी कौशल्य आणि अचूकता आवश्यक असते. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारा आर्थ्रोस्कोप हा १.९ मिलिमिटर एवढ्या छोट्या आकाराचा असतो. सांध्याच्या ठिकाणी वेदनेसाठी कारणीभूत असलेल्या पदार्थाला काढून टाकण्यासाठी जॉईंट आर्थ्रोस्कोपीची शस्त्रक्रिया केली जाते. आवश्यकता भासल्यास डिस्क रिपोझिशनींग यासारख्या प्रगत उपचार पद्धतीचा अवलंबही केला जाऊ शकतो,” असे डॉ पुष्कर वाकनीस, साईश्री हॉस्पिटल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “टीएमजे म्हणजे असे ठिकाण जिथे खालचा जबडा आणि कवटी जोडले जातात. मानवी शरीरातील हा सर्वात क्लिष्ट पद्धतीचा सांधा मानला जातो. त्यामुळे अशा अवघड ठिकाणी करावी लागलेली शस्त्रक्रिया साईश्री हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला भूल देण्यात आली होती. तसेच शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले.”
जबड्याच्या दुखण्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींना टीएमजे आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारल्याचा अनुभव आहे. जबड्याचे दुखणे म्हणजे फार काही गंभीर समस्या नाही असा काहींचा गैरसमज असतो. मात्र त्या दुखण्याचा त्रास कशाप्रकारे होते आणि दैनंदिन जीवन कसे प्रभावित होते याचा अनुभव फक्त संबंधित रुग्णांनाच येतो.