Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीप्रवीण जगताप यांची भाजपा हडपसर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

प्रवीण जगताप यांची भाजपा हडपसर विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

कोंढवा प्रतिनिधी

भाजपाचे युवा व निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीण मधुकर जगताप यांची भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र मा.आ. योगेश आण्णा टिळेकर ,पुणे शहर सरचिटणीस गणेश घोष ,हडपसर अध्यक्ष संदीप दळवी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जगताप यांचा कोंढवा खुर्द भाजपाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.

सदर सत्कार समारंभावेळी बोलताना नूतन पदाधिकारी प्रवीण जगताप म्हणाले की, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असून केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. राज्यातही भाजपा एक सक्षम विरोधी पक्ष आहे. माझ्यावर पक्षाने सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातील सर्व समाजातील तरुणांना संघटित करून नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ करून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कोंढवा परिसरात जगताप यांचा मोठा मित्रपरिवार असून त्यांचे विविध राजकीय पक्षांचे सलोख्याचे संबध आहेत. तर त्यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे मा नगरसेवक भरत चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

याप्रसंगी संघटन सरचिटणीस गणेश घुले, हडपसर सरचिटणीस सुनील कामठे ,हडपसर युवा मोर्चा अध्यक्ष अमर कैलास गव्हाणे , भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!