Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेसचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा

सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा

मल्हार न्यूज प्रतिनिधी,

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस पुणे लष्कर भागातील नवा मोदीखाना मधील सचिन तेंडुलकर यांचे चाहते व त्याच्या छायाचित्रांचा संग्रह करणारे क्रिकेट प्रेमी राजू गायकवाड यांच्या निवासस्थानी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला . गेले अनेक वर्षांपासून सचिन तेंडुलकर यांचा छायाचित्रांचा संग्रह राजू गायकवाड करत आहे . खुद्द सचिन तेंडुलकर यांनी हा छायाचित्रांचा संग्रह पाहिलेला आहे . सचिनच्या कारकिर्दीला उजाळा देणारे या छायाचित्रांचे कौतुक व राजू गायकवाड यांचे कौतुक केले होते . हा राजू गायकवाड यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता . याकामी त्याला त्यांचे बंधू पोपट गायकवाड , पुतण्या ऍड नितेश गायकवाड व त्याचे कुटुंबीय मदत करतात . आपल्या बँकेच्या  वेळ काढून राजू हा छायाचित्रांचा संग्रह करीत आहे. त्याने सचिनला केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी क्रीडा प्रेमी उपस्थित होते. 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments