मल्हार न्यूज प्रतिनिधी,
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस पुणे लष्कर भागातील नवा मोदीखाना मधील सचिन तेंडुलकर यांचे चाहते व त्याच्या छायाचित्रांचा संग्रह करणारे क्रिकेट प्रेमी राजू गायकवाड यांच्या निवासस्थानी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला . गेले अनेक वर्षांपासून सचिन तेंडुलकर यांचा छायाचित्रांचा संग्रह राजू गायकवाड करत आहे . खुद्द सचिन तेंडुलकर यांनी हा छायाचित्रांचा संग्रह पाहिलेला आहे . सचिनच्या कारकिर्दीला उजाळा देणारे या छायाचित्रांचे कौतुक व राजू गायकवाड यांचे कौतुक केले होते . हा राजू गायकवाड यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता . याकामी त्याला त्यांचे बंधू पोपट गायकवाड , पुतण्या ऍड नितेश गायकवाड व त्याचे कुटुंबीय मदत करतात . आपल्या बँकेच्या वेळ काढून राजू हा छायाचित्रांचा संग्रह करीत आहे. त्याने सचिनला केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी क्रीडा प्रेमी उपस्थित होते.