कोंढव्यातील स्व.राजेंद्र बाळासाहेब लोणकर इ लर्निंग शाळेचे राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन ….

856

कोंढवा खुर्द येथील विद्यार्थ्यांना आता इ लर्निंग शाळेच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाचे धडे…

गणेश जाधव, प्रतिनिधी

कोंढवा खुर्द भागातील विद्यार्थ्यांना एक आदर्शवत ई लर्निंग शाळा पुणे महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रयत्नांनी तयार झाली. या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते स्वर्गीय राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई लर्निंग शाळेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले “कोरोनामुळे शाळेत ती मजा राहिली नाही तसेच आधुनिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे”.
पुणे महानगरपालिकेचे मनसे गटनेते साईनाथ बाबर यांनी उद्घाटन प्रसंगी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल उपस्थित ग्रामस्थांनसमोर मांडला आणि येणाऱ्या काळात अजून जोमाने काम करून गावाचा विकास करू असे मत त्यांनी व्यक्त केले.

स्व.राजेंद्र लोणकर यांच्या मातोश्री रखमाबाई लोणकर, मंगल राजेंद्र लोणकर आणि समस्त लोणकर परिवार , समस्त महाराष्ट्र सैनिक, इतर पदाधिकारी , कोंढवा खुर्द  ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक वसंत मोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे, प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका शिक्षण प्रमुख सौ मीनाक्षी राऊत,  मा. नगरसेविका आरती बाबर,  सतीश शिंदे, शेखर लोणकर, महेश लोणकर, मनसेचे पदाधिकारी, सहाय्यक शिक्षण प्रमुख विजय आवारी, माणिक सोनवलकर सर, शाळेचे मुख्याध्यापक राहुल जाधव हे देखील उपस्थित होते.