Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीभाजप नेते किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी केली धक्काबुक्की..... सोमय्या खाली पडले...

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी केली धक्काबुक्की….. सोमय्या खाली पडले …….

पुणे:प्रतिनिधी
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. शह प्रतिशह देण्यासाठी आता पासूनच राजकीय बॅनर वॉर सुरू झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांची करमणूक होऊ लागली आहे. असे असताना आज शनिवारी पुणे महानगरपालिकेत धक्कादायक प्रकार घडला. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवसेना कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना धक्काबुक्की केली.या हमरातुमरीत सोमय्या मनपाच्या पायरीहून पाय घसरून अक्षरशः खाली पडले.त्यांना सुरक्षा रक्षकांनी तात्काळ उचलून गाडीत बसून नेले.त्यामुळे अनर्थ टळला. या प्रकाराची माहिती समजताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून यांच्यावर संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण एन थंडीत ‘हॉट’ झाले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!