आळंदीत ई-बाईक रॅलीचे मंगळवारी आयोजन सहभागासाठी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे आवाहन

432

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत मंगळवारी (दि.८) ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती आणि यामुळे होणार प्रचंड इंधनाचा वापर तसेच यामुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सुरु आहे. या अभियान अंतर्गत मंगळवारी आळंदी शहरातील नागरिकांना ई-वाहने वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शहरात सकाळी दहा वाजता ई- बाईक वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात ज्या वाहन धारकांकडे ई- बाईक वाहन आहे,त्यांनी या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे. आळंदी नगरपरिषद व मल्टिटेक ई मोटर्स यांचे वतीने या वाहन रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. आळंदी नगरपरिषद चौक ते काळे कॉलनी,देहू फाटा मार्गे डुडुळगाव त्यानंतर परत देहू फाटा मार्गे चाकण चौक प्रदक्षिणा मार्गे आळंदी नगरपरिषद चौकात या रॅलीची सांगता होईल.
येथील ई बाईक प्रचार प्रसार अंतर्गत जनजागृती केंद्रातून येथील नागरिक दत्ता गुरव यांनी ई बाईक घेतली. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे हस्ते दत्ता गुरव यांना वाहन सुपूर्द करण्यात आले. आळंदीत आयोजित उपक्रमास प्रदूषण रोखण्याचे हेतूने जनजागृतीस मोठा प्रतिसाद मिळाला.आळंदी नगरपरिषद आळंदी माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत ई- बाईकचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, दिघी आळंदी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, आरोग्य विभागाचे प्रमुख शीतल जाधव, दत्ता गुरव उपस्थित होते.