गिरीश भोपी, पनवेल
“सामाजिक कार्याची आवड असेल तर सवड काढता येते” असे म्हणत 90 टक्के समाजकारण व केवळ दहा टक्के राजकारण करणाऱ्या एडवोकेट बापू पोळ् यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात ज्येष्ठ श्रेष्ठयांच्या स्थानिक रहिवासी व बच्चेकंपनीच्या उपस्थितीत ऐरोली येथील कार्यालयात पार पडला.
वाढदिवसाच्या औचित्य साधून ऐरोली प्रभाग क्रमांक 16 येथील भाजपा कार्यालय प्रभागात सेक्टर 15, सेक्टर 16, सेक्टर 17, सेक्टर 4 च्या जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबिर व ईश्रम कार्ड, युनिवर्सल पास शिबिरचा कार्यक्रम, स्वच्छ प्रभाग अभियान यासह मदर तेरेसा आश्रम येथे फळ, सॅनिटायझर व मास्क, वाटप असे समाजोपयोगी कार्यक्रम सकाळी आठ ते सायं. पाच वाजेपर्यंत राबविण्यात आले.
सदर कार्यक्रम मा. लोकनेते आमदार श्री.गणेश नाईक साहेब यांचे प्रतिनिधी ज्येष्ठ समाजसेवक श्री दिनेश पारेख साहेब, माजी आरोग्य सभापती अशोक पाटील यांच्या वतीने प्रभागातील व ऐरोली नवी मुंबईतील सर्व मित्र परिवार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सदर कार्यक्रमासाठी प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हजर होते. त्याचप्रमाणे समाजसेवक पांडू दादा, समाजसेविका निवेदिता बापू पोळ, समाजसेवक हिरामण कांचार, थोरात साहेब, सौ वैशाली ताई, संजय वानखडे , एडवोकेट रंजना वानखेडे, पि.के खरात, नंदा ताई,देवरे ताई, ज्येष्ठ नेते नेताजी भांगे अशा अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वच्छ प्रभाग अभियान, आरोग्य तपासणी शिबिर, ई-श्रम कार्ड युनिवर्सल पासभाजपा जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक 16 येथे रहिवाशांना देऊन उपक्रम राबवण्यात आला. त्याचबरोबर सॅनिटायझर, फळ वाटप वाटपाचा कार्यक्रम ऐरोली येथे पार पडला.
विशेष म्हणजे बापू पोळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास विद्यमान आमदार गणेश नाईक साहेब,माजी आमदार संदिप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शासकीय कामानिमित्त बाहेर असल्यामुळे फोन करून सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल व वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून बापू पोळ यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरां च्या हस्ते पोळ दाम्पत्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास, सचिन कदम सुशील गावडे, प्रमोद सावंत,
यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील हितचिंतक, मित्रपरिवार, व नवी मुंबईतील सर्व पत्रकार बंधु आवर्जून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात उपस्थितांना केक सहित अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.