आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद, मल्टी टेक ई मोटर्स यांच्या वतीने आळंदीत आयोजित ई बाईक रॅलीला उत्साही प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवीत रॅलीला प्रारंभ झाला.
या प्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, उपनिरीक्षक साहेब जोंधळे, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे,माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील,सचिन थोरवे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकसे, मुकादम मालन पाटोळे, आरोग्य विभाग प्रमुख शीतल जाधव आदीसह कार्यालयीन कर्मचारी, महिला, पुरुष, शालेय मुले, मुली आदी उपस्थित होते.
माझी वसुंधरा २ .० अभियाना अंतर्गत ई- बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ई- बाईक रॅलीत मुख्य उद्देश पेट्रोल, डिझेल या सारख्या जिवाश्म इंधनाच्या वापरामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जनजागृती असल्याचे यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले. ई- बाईक रॅली आळंदी नगरपरिषद मार्गे, काळे कॉलनी चौक, देहू फाटा मार्गे डुडुळगाव ते परत देहू फाटा, चाकण चौक, वडगाव चौक, मरकळ चौक मार्गे आळंदी नगरपरिषद येथे सांगता झाली. यावेळी मल्टी टेक ई मोटर्सचे सचिन थोरवे आदींचा समारोपात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपाध्यक्ष नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख शीतल जाधव, मालन पाटोळे आदी उपस्थित होते. नागरिकांनी तसेच ई बाईक वाहनधारक दत्ता गुरव यांचेसह वाहनधारकांनी या रॅलीत सहभाग घेतला.