आळंदीत शनिवार पासुन माऊलींचे स्पर्श दर्शन गणेशावतार श्रींना पहिली चंदनउटी

440

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांना माऊलींचे संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन शनिवार (दि.२) पासून भाविकांना मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेले श्रींचे संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन आता गुढीपाडव्याला सकाळी सहा वाजले पासून सुरु होत असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
या संदर्भात आळंदी देवस्थानने स्पर्श दर्शन भाविकांना खुले करण्याचा निर्णय घेतला असून इतर नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रम देखील सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये भाविकांच्या पूजा अभिषेख यांचाही समावेश आहे. गुढी पदव्या पासून श्रींचे चलपादुका पूजा भाविकांना करता येणार आहे. यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक महिने कोरोना महामारीचे संकट काळात पूजा तसेच थेट श्रींचे संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते.
भाविकांच्या चलपादुका पूजा आणि श्रींचे गाभा-यात श्रींचे समाधीचे थेट स्पर्श दर्शन देण्याचे निर्णयाचे भाविक,नागरिकांचे वतीने माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांनी स्वागत केले आहे. या निर्णयासाठी भोसले पाटील यांनी शासन स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करून येथील वस्तुस्थितीची माहिती पुणे जिल्हाधिकारी यांना कळविली होती.
कोरोना संकट काळात शासनाचे मार्गदर्शक,सूचना, आदेश तसेच निर्बंध यामुळे अनेक महिने भाविकांना थेट समाधी दर्शन बंद होते. आळंदी देवस्थानने श्रींचे स्पर्श दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे भाविकांनी देखील स्वागत केले आहे. अनेक महिन्यांचा स्पर्श दर्शनाचा दुरावा आता २ एप्रिल पासून दूर होत असल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. भाविकांनी देखील मंदिर व परिसरात गर्दी न करता तसेच कोरोनाचे काळातील सूचना, आदेश, मास्क चा वापर भाविकांनी करावा असे आवाहन देसाई यांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या निर्णयाने श्रींचे स्पर्श दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. मंदिरात देखील कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ देवदर्शन देण्याचे नियोजन करण्यात येत असून देवस्थानचे सूचनादेशांचे मंदिरात पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या स्पर्श दर्शनापासून वारकरी, भाविक दुरावले होते. आता मात्र गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी (दि. २ एप्रिल) माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन होणार आले. यामुळे आळंदीतील नागरिक,भाविक, व्यावसायिक, मंदिर परिसरातील व्यापारी यांच्यात समाधानाचे वातावरण असून या निर्णयामुळे दळणवळण वाढून झालेले अर्थी नुकसान भरून येणार नसले तरी रोजीरोटी साठीची उलाढाल वाढणार आहे. यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवाच्या दिवशी ( दि. २ ) सकाळी सहा वाजल्यापासून श्रींचे दर्शन सुरु होणार आहे. दुपारी श्रींचे उटी दर्शन परंपरेने होणार आहे. आळंदीतील परंपरा आणि धार्मिक कार्यक्रमात दर वर्षी गुढी पदव्या पासून श्रींचे संजीवन समाधीला चंदन उटी व चंदन लेप लावला जातो. श्रींचे उटीतील वैभवी दर्शन देखील लक्षवेधी असते. भाविकही उटी दर्शनास मंदिरात गर्दी करतात.
गुढी पाडव्या पासून अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन दिले जाणार आहे. मात्र करोना महामारीचे संकट अद्यापही पूर्ण पणे टळलेले नाही. यामुळे श्रींचे स्पर्श दर्शन हे वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता, लहान बालकांनी आळंदी देवस्थान कमिटीने ऑनलाइन दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. या सेवासुविधेचा देखील लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले आहे.