आळंदीतील पाणी पुरवठा तांत्रिक कारणाने खंडित

320

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीला कुरुळी टॅपिंग मधून शहरास होणारा पाणी पुरवठा थांबल्याने आळंदीत शुक्रवार पासून आळंदी गावठाण परिसरातील आणि शनिवारी ( दि. २३ ) आळंदी हवेली विभागातील पाणीपुरवठा खंडित झाला असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
आळंदीला रॉ वॉटर पुरवठा भामा-आसखेड पंपहाऊस मधील विद्युत तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरु असल्याने करता आला नाही. यामुळे आळंदीतील दोन्ही विभागातील पाणी पुरवठा खंडित झाला असून संबंधित तांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्या नंतरच आळंदी गावठाण खेड विभाग आणि आळंदी देहूफाटा हवेली विभागातील पाणी वितरण जलशुद्धीकरण केंद्राला जल पुरवठा उपलब्ध झाल्या नंतर होणाऱ्या पाणी साठ्याचे प्रमाणात झोन निहाय पूर्ववत सुरु केला जाईल असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले. या बिघाडाची दखल घेऊन नागरिकांनी आपले कडे उपलब्द्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे.