१०,००० नागरिकांची मोफत मोतीबिंदू तपासणी आणि “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन”
दादा लेझर आय इन्स्टिट्यूट (DLEI), ही पुण्यातील एक अग्रगण्य आय केयर फॅसिलिटी असुन त्यांनी मोतीबिंदू द्वारे येणार्या अंधत्वास (कॅटरॅक्ट ब्लाइंडनेस ) रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे., मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्या सारख्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता आणण्यासाठी ते एक मोहीम सुरू करत आहेत.
या समस्येची गंभीरता ओळखून, द अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी (AAO) आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (AIOS) यांनी जून २०२३ हा “मोतीबिंदू जागरूकता महिना” म्हणून घोषित केला आहे.
या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटचे संचालक आणि जगातील सर्वात जलद आणि सुरक्षित व्हिजन करेक्शन टेक्नीक (दृष्टी सुधारण्याचे तंत्रज्ञान) – VOZ आणि SAFE चे शोधकर्ता डॉ. जीवन लाडी, १ जून २०२३ पासून मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वास टाळण्यासाठीच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. ज्यात डीएलईआय (DLEI) चे उदिष्ट आहे १०,००० नागरिकांना मोफत मोतीबिंदू चाचणी प्रदान करणे, या प्रति चाचणीचे मुल्य आहे १००० रूपए म्हणजेच ते एकून १ कोटी रूपयांच्या निशुल्क तपासनीद्वारे आपले मोठे योगदान देत आहेत.
मोफत नेत्र तपासणी शिबिरासोबतच, दादा लेझर आय इन्स्टीट्यून ने रविवार, ४ जून २०२३ रोजी “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन” (कॅटरॅक्ट फ्री पुणे वॉकेथॉन) चे आयोजन केले आहे. या वॉकथॉनची सुरुवात सकाळी ७.३० वाजता साधू वासवानी रोडवरील साधू वासवानी पुतळ्यापासून होईल आणि गुलमोहर अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, पुणे ४११००१ येथे असलेल्या दादा लेझर आय इन्स्टिट्यूट येथे या वॉकथॉनची समाप्ती होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील आणि आर.जे संग्राम खोपडे बिग एफ.एम यांच्या हस्ते या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि यातील समाजाच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात येईल. या मोतीबिंदू अंधत्व निवारणाच्या जनजागृतीसाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डीएलईआय कडून करण्यात आले आहे.
“कॅटरॅक्ट वॉकथॉन” आणि मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्वरीत नोंदणीसाठी (३० जून २०२३ पूर्वी) इच्छुक ९९२२९९५५४९ या डीएलईआयच्या अधिकृत क्रमांक वर कॉल करू शकतात. या मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीसाठी लवकर नोंदणी करणाऱ्यांना किंवा शस्त्रक्रियेसाठी देखील २० % सवलत मिळेल.
उशीरा नोंदणी (१ जुलै २०२३ नंतर) मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी किंवा शस्त्रक्रियेसाठी निर्धारीत तारखेनंतर नोंदणी करणाऱ्या व्यक्ती देखील १० % सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
त्वरा करा आणि मोतीबिंदू जागरूकता वॉकथॉन मध्ये आपले स्थान निश्चीत करा, कारण केवळ १०० लोक यात सहभागी होऊ शकतात.या कार्यक्रमाला दादा लेझर आय इन्स्टिट्यूट, बीव्हीआय फिजिओएल आणि मायक्रो व्हिजन फार्मा (BVI PhysIOL and Micro Vision Pharma ) कंपनीचे समर्थन मिळाले आहे, त्यांनी या सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे.
“वॉक टू अव्हॉइड कॅटरॅक्ट ब्लाईंडनेस” – कॅटरॅक्ट फ्री- पुणे वॉकथॉनची ही या वॉकथॉनची थीम असुन – मोतीबिंदू-संबंधित अंधत्व टाळण्यासाठी आणि आपल्या जनसमुदायामध्ये डोळ्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम निश्चीतच आवश्यक आहे.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना डॉ. जीवन लाडी (डीएलईआय चे संस्थापक) म्हणाले की, “मी ही मोहीम गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यासाठी, त्यांना निरोगी दृष्टीची भेट देण्यासाठी आणि त्यांना स्पष्ट आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी सक्षम बनवण्याची संधी मिळावी यासाठी सुरू केली आहे. आणि माझा ठाम विश्वास आहे की विशेषत: जेव्हा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेने मोठा फरक पडू शकतो तेंव्हा कोणालाही या टाळता येण्याजोग्या अंधत्वाचा त्रास होऊ नये, या मोहिमेद्वारे, मोतीबिंदूबद्दल जागरुकता वाढवणे, लवकर निदानास प्रोत्साहन देणे आणि मोतीबिंदू-संबंधित अंधत्वाविरुद्धच्या लढ्यात कोणीही मागे राहू नये हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. “
दादा लेझर आय इन्स्टिट्यूटने हाती घेतलेली मोतीबिंदू जागृती मोहीम सर्व नागरिकांना मोतीबिंदूशी संबंधित अंधत्वाविरूद्ध सक्रिय उपाययोजना करण्यासाठी जागृत करण्याचे आवाहन करते. एकत्रितपणे, आपण निश्चितच बदल घडवू शकतो आणि मोतीबिंदू मुक्त शहर निर्माण करू शकतो.
मोतीबिंदू हे आज जगभरातील अंधत्वाचे एक प्रमुख कारण बनले आहे, भारतातील ८० % पेक्षा जास्त अंध व्यक्तीं या अवस्थेतुन जातात. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील अंदाजे ३८ लाख लोक दरवर्षी मोतीबिंदू मुळे अंध बनतात, ज्यामुळे देशातील १ कोटी २० लाख अंध व्यक्तींची संख्या हा चिंताजनक विषय आहे.
मोतीबिंदू मुळे येणारे अंधत्व टाळले जाऊ शकते आणि या राष्ट्रव्यापी आव्हानाचा सामना करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.