आळंदीत स्मृती शताब्धी निमित्त आयोजित कृतज्ञता पर्वात १०० सेकंद स्तबद्धता

310

अर्जुन मेदनकर,आळंदी

:मानव कल्याण व सकस समाज निर्मिती साठी आपले राजसिंहासन पणाला लावून समाज बदलण्याचे काम करणारा, प्रजाहितासाठी आपले राजेपण बाजूला ठेऊन समाजातील सर्वांना समान दर्जा देऊन जातीअंत झाल्यास समाज समान पातळीवर येईल. यासाठी धोरण राबवून आपल्या कारकीर्दित ख-र्या अर्थाने लोकशाही प्रस्तापित करणेसाठी सत्ता व संपत्तीचा वापर जनतेच्या उन्नतीसाठी करणाऱ्या व शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, आरोग्य व शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविणाऱ्या लोकहितकारी, जाणत्या राजास स्मृती शताब्धी निमित्त आयोजित कृतज्ञता पर्वात १०० सेकंद स्तबद्धता पाळून विनम्र अभिवादन विविध सेवाभावी संस्थाचे वतीने करण्यात आले.

आळंदी इंटरसिटी सर्व्हिसेस मध्ये आयोजित यावेळी भाजपचे माजी आळंदी शहराध्यक्ष भागवत आवटे, भाजपचे संघटन भागवत काटकर, ध्यास फाउंडेशनचे विश्वस्त श्री गणेश गरुड, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराजे भोसले, वृक्ष प्राधिकरण सदस्य एकनाथ मोरे, सरचिटणीस सदाशिव साखरे, बाजीराव नागरगोजे, वाणी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नेचर फाउंडेशन, यशवंत संघर्ष सेना, आळंदी जनहित फाउंडेशन, एल्गार सेना, शिव संघटना आदी संस्थानचे वतीने राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा सचिव भागवत आवटे यांचे वाढदिवस निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्द्धी निमित्त त्यांचे कार्याचा गौरव करीत त्यांच्या विचार व कार्य इतरांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे संयोजन केले.