अलंकापुरीत क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

489

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील धनगर समाज धर्मशाळा,आळंदी नगरपरिषद, साई मंगल कार्यालय, मदर तेरेसा अनाथ मुलींचे आश्रम यासह विविध ठिकाणी विविध सेवाभावी संस्थानचे वतीने क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९१ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी अभिवादन,प्रतिमा पूजन, समाज प्रबोधन तसेच अन्नदान उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
यावेळी शिवा संघटना आळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, यशवंत संघर्ष सेना अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, एल्गार सेनेचे आळंदी शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, आळंदी नगरपरिषद माजी नगरसेवक अशोक कांबळे, सचिन गिलबिले, प्रशांत कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक किशोर ,दिलीप साळुंके, तरकासे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष कारेकर, अभयानंद महाराज लोखंडे, सोमनाथ साखरे, लक्ष्मण ढाके, कल्लय्या स्वामी, सोमनाथ साखरे, नानासाहेब मोरे, हवगीराव भुसारे, कैलासअप्पा चिंचोलकर, ओमकार सगरे, शिवानंद कलशेट्टी, त्रिंबक स्वामी, लखन स्वामी, आबासाहेब खैरनार, नागेश स्वामी, सिद्धेश्वर सलगर, मनीष कोरडे, नारायण घोलप, शिवाजी जाधव, सिद्धेश्वर शेळगावे, गणेश मुंजाळ, निलेश ढोकणे, रमेष शेलार, सामाजिक संघटना, समाज बांधव, वीरशैव लिंगायत समाज बांधव, नगरपरिषद कर्मचारी, तसेच सर्व सामाजिक संघटना, सर्व ओबीसी संघटना, वीरशैव लिंगायत समाज बांधव, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आळंदी शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आळंदी शहर भाजपचे वतीने शहराध्यक्ष किरण येळवंडे, भागवत काटकर, ज्ञानेश्वर बनसोडे आदी उपस्थित होते.
आळंदी पंचक्रोशीत कार्यरत शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, आळंदी शहर भाजप, आळंदी नगरपरिषद, आळंदी जनहित फाऊंडेशन, यशवंत संघर्ष सेना, यल्गार सेना तसेच विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, ओबीसी संघटना, पोलीस वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया, वीरशैव लिंगायत समाज सेवाभावी संस्था तसेच बांधव यांच्या वतीने संयुक्त पणे क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमेचे पूजन,पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करीत अभिवादनाने साजरी करण्यात आली.
यावेळी आळंदी शहर व परिसरातील सर्व सामाजिक संघटना, सर्व ओबीसी संघटना, सर्व समाज, वीरशैव लिंगायत समाज बांधव व शिवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक , आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९१ व्या जयंती उत्सवात स्वयंस्फूर्तीने समाज बांधव सहभागी झाले होते.
यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे, सचिन गिलबिले, विष्णू कुऱ्हाडे, सदाशिव साखरे, भागवत काटकर, शिवाजी जाधव, अभयानंद महाराज लोखंडे, किरण येळवंडे, ज्ञानेश्वर बनसोडे आदींनी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित मार्गदर्शन केले. यावेळी समाज विकासाच्या विषयावर अनेक समस्यां उपस्थित करीत अडीअडचणी सोडविल्या जातील अशी ग्वाही यावेळी अशोक उमरगेकर यांनी देत समाज बांधवांशी संवाद साधला.