क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेकनिमित्त पंंचामृताभिषेक

280

छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृृती पुतळ्यास मानाचा मुजरा

नंदुरबार– येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. जुनी नगरपालिका जागेवरील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृृती पुतळ्यास पंंचामृताने अभिषेक करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, असा जयघोष करीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करुन अभिवादन करण्यात आले.

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा सालाबादाप्रमाणे यावर्षीही काल दि.6 जून 2022 रोजी असल्याने नंदुुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचा पंचामृत दुग्धाभिषेक करण्यात आला. नंदुरबार शहरातील जुन्या नगरपालिका परिसरात सुशोभित चबुतर्‍यावरील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दही व दुध पंंचामृताने विधीवत अभिषेक करुन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करुन शिवप्रेेमींनी छत्रपती शिवरायांना मानाचा मजुरा करीत अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष केला. याप्रसंगी क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, गणेश मराठे, दिपक मराठे, राहुल मराठे, धिरज मराठे, मुकेश मराठे, मोहिनीराज राजपूत, चेतन राजपूत, उपेंद्र राजपूत, राजा राजपूत, भगतसिंग राजपूत, निलेश चौधरी, संजय साठे, रवी सामुद्रे, मयूर चौधरी, चेतन सोनवणे, कुणाल फटकाळ, धनराज मराठे, दिपकदादा मराठे, कृष्णाराजे मराठे आदी उपस्थित होते.