आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील गोलेगाव पिंपळगाव ( ता. खेड ) आदर्श माता श्रीमती सरस्वतीबाई काळूराम चौधरी ( वय ७६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गोलेगाव पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन, माहिती अधिकार ज्येष्ठ कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी यांच्या त्या मातोश्री होत. गोलेगाव पिंपळगाव मधील वैकुंठ स्मशानभूमीत इंद्रायणी काठी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीसह विविध सेवाभावी संस्था,मान्यवर पदाधिकारी,ग्रामस्थ यांचे वतीने भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.