आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक पर्यावरण दिना निमित्त ऑनकापुरीतील वैभव असलेल्या पुरातन संत लीलाभूमीत आळंदी नगरपरिषद, आरंभ फाउंडेशनसह विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती, पदाधिकारी यांचे वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि उपस्थितांचे हस्ते अजानवृक्ष पुजा हरिनाम गजरात करण्यात आली. या उपक्रमात आरंभ फाउंडेशन, सहयोगी संस्था यांनी सिध्दबेटात श्रमदानातून वृक्षारोपण मोहिमेस जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरणाचे संवर्धन,आणि माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत स्वच्छतेची शपथ घेत पर्यावरण दिन वृक्षारोपण करीत साजरा केला.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील, पदाधिकारी विनायक पाटील, आदित्य पाटील, श्रावणी पाटील, अंजना गायकवाड, तानाजी भोसले, अजिंक्य जकिनकर , आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, एल्गार सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कवळासे,पोलीस मित्र वेल्फेअर कारण कोल्हे, शांताराम बोबडे, एल अँड एल प्रोडक्ट्स कंपनीचे मोरेश्वर पाटील, प्रफुल चासकर, वैभव जाधव, निखिल घोडेकर, किशोर तळेले, राजेश मोहंती, संकेत, निलेश कदम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच पुणे सुरेश देसाई, उल्हास दादा पठाडे, निलेश काळे, चंदू पराते, चंदू दाऊतपुरे, अलका देसाई, शिल्पा दाऊतपुरे, पल्लवी पठाडे, अनिरुद्ध देसाई, वेदिका देसाई, बाजीराव नागरगोजे, दिनकर तांबे, प्रल्हाद भालेकर, भावीक, नागरिक स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी आरंभ फाउंडेशनचे अध्यक्षा वैष्णवी पाटील म्हणाल्या, सर्वांनी फक्त एक दिवस पर्यावरण दिन साजरा न करता रोजच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आळंदी नगरपरिषद व राज्य शासन सिद्धबेटचा विकास करीत आहे. त्यांचे समवेत काम करून या भागातील पुरातन वैभव अजानवृक्ष संवर्धन, स्वच्छता व सुशोभीकरण हे सेवा भावनेतून आपण करत आहोत. सिद्धबेटाचे अध्यात्मिक महत्व असतानाच इथे येणारे वारकरी संप्रदायातील अभ्यासासाठी येणारे विद्यार्थी आणि भाविक यांना सुंदर नैसर्गिक वातावरण निर्माण करून देण्यासाठी देशी झाडांची ओळख वाढवण्यासाठी अध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेली पंचवाटीका उभी करत आहोत. शासनावर अवलंबून न राहता आपल्या पुढील पिढीसाठी प्रत्येकाने झाडे लावणे ,नदी स्वच्छता आणि प्लास्टिक कचरा वेगळा करून देणे ही आपली जबाबदारी मानून प्रत्येकाने आळंदी नगरपरिषदेच्या कार्यात सहकार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी यावेळी माझी वसुंधरा,स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत आळंदीत होत असलेल्या कार्याची माहिती देत.या कार्यात सेवाभावी संस्था सहभागी झाल्याने येथील विकास कामास तसेच हरित पट्टा अधिक गतीने हरित होऊन सिद्धबेट विकास निर्धारित वेळे पेक्षा लवकर विकसित होईल. आळंदी नगरपरिषद देखील २ हजार ५०० वर वृक्ष येथे लावत असून पर्यावरण संवर्धन, हरित आळंदी, स्वच्छ आळंदी , सुंदर आळंदी या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा अंतर्गत शपथ देत सर्वानी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आरंभ फाउंडेशनच्या अध्यक्षा वैष्णवी पाटील, आळंदी अहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर,एल्गार सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब कवळासे,पोलीस मित्र वेल्फेअर कारण कोल्हे, शांताराम बोबडे, एल अँड एल प्रोडक्ट्स कंपनी टीम, शांताराम बोबडे, अनिल जोगदंड आदींचा फुलझाडं देऊन सन्मान करण्यात आला.
Home
पश्चिम-महाराष्ट्र
पुणे आळंदीत जागतिक पर्यावरण दिनी अजानवृक्ष पुजा वृक्षारोपणास सेवाभावी संस्थाचा प्रतिसाद