आळंदी यात्रेत स्थानिक नागरिकांची अडवणूक

1250

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आषाढी यात्रा अंतर्गत माऊलींचे प्रस्थान सोहळ्याचे वाहतूक नियोजनात स्थानिक नागरिक, स्थानिक कामगार, व्यापारी आणि प्रवासी, शेतकरी यांचे रहदारीत पोलीस प्रशासनाने नाहक त्रास देत असल्याने स्थानिकांची गैरसोय दूर होण्यासाठी आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेस निवेदन देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी शिष्ठ मंडळाने केली आहे.
या संदर्भात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, दिघी – आळंदी वाहतूक पोलिस शाखा वाहतूक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डी.डी.भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाशशेठ कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज कुऱ्हाडे, बाळासाहेब चौधरी,दिलीप तात्या कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहन कुऱ्हाडे, अमित कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील,सौरभ गव्हाणे, सुदर्शन शिंदे, निखिल बनसोडे आदी पदाधिकारी, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक वाहनधारक नागरिक , व्यापारी, शेतकरी यांची स्थानिक ओळखपत्र आधार कार्ड दाखवून देखील ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिकांत प्रचंड रोष व संताप निर्माण झाला आहे. याबाबत सोशल मीडिया वर देखील प्रचंड संताप व नाराजी अनेकांनी व्यक्त केली असल्याचे युवानेते रोहन कुऱ्हाडे यांनी सांगितले.
आळंदीतील देहू फाटा चौकात, वाय जंक्शन, चाकण चौक, वडगाव चौक ,विश्रांतीवड चौक, पी.सी.एस.चौक या ठिकाणा हुन आळंदीतील स्थानिक नागरिकांना रहदारीला त्रास झाला आहे. पोलीस प्रशासनाने स्थानिक नागरिकांची वर्दळ ये-जा वगळून यात्रेतील वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक असताना राज्यातील भाविकांच्या वाहनांना ऐवजी स्थानिकांची वाहने अडवून त्रास दिला आहे. याबाबत संबंधित वाहतूक पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचनादेश देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास ही बाब निदर्शनास आणून देऊन कामकाज करण्याची मागणी यावेळी शिष्ठ मंडळाने केली आहे. राज्यातून येणाऱ्या वाहनावर कारवाई करण्या ऐवजी स्थानिकांची वाहने अडविणे योग्य नाही. आळंदी यात्रा काळात नियोजनात स्थानिक नागरिकांचे नेहमी सहकार्य असते. यामुळे यात्रेत राज्यातून येणा-या वाहनांमुळे वेढीस धरू नये अशी मागणी यावेळी आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.