गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप. सोसायटी कडुन डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार

298

वाघोली प्रतिनिधी,

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप. सोसायटी नांदेड़ चे संस्थापक हेमंत पाटील ,  राजश्रीताई पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक  धनंजय तांबेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी शाखा वाघोलीच्या वतीने 1 जुलै 2022, रोजी डॉक्टर्स डे निमित्त वाघोली भागातील डॉक्टर्सना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान डॉ.सुनील पालवे, डॉ. निलेश खंदारे, लोटस हॉस्पिटल चे डॉ.लक्ष्मीकांत बेहले आणि डॉ. अभिजित लांडगे, डॉ. दिलीप कदम यांना प्रमाणपत्र देऊन समाजासाठी केल्या जाणाऱ्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळेस गोदावरी अर्बन क्रेडिट को- ऑप सोसायटीचे वाघोली शाखा प्रभारी कोमल तिवारी, ज्युनियर ऑफिसर दिपाली बारडे, ज्युनियर ऑफिसर अमित साळवे, सब स्टाफ महादेव चवंडके, यावेळी उपस्थित होते.