आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने रोम ( इटली ) येथे २३ ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने पंच म्हणून निवड करण्यात आली. जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्रा. दिनेश गुंड इटलीला रवाना झाले आहेत.
दिनेश गुंड हे जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक जागतिक, आशियाई, ऑलम्पिक पात्रता विश्वचषक स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. १०० हुन अधिक राष्ट्रीय स्पर्धा व ४८ आंतरराष्ट्रीय स्पर्धा इतका प्रचंड अनुभव असलेले ते महाराष्ट्रातील एकमेव पंच आहेत. ही गुंड यांची ४९ वी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पंच म्हणून आहे. त्यांनी या कामासाठीची अर्धशतकाची वाटचाल लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी आळंदी पंचक्रोशीसह राज्यातून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.