सामाजिक बांधिलकी जपत बी. एल. मानकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व आरोग्य तपासणी

338

पुणे प्रतिनिधी,

ज्या मुला- मुलींना शाळेची किंवा कॉलेज ची फी भरणे जमत नाही तसेच ग्रामीण ,दुर्गम भागातील आर्थिक परिस्थिती नसलेले गरीब विद्यार्थी की ज्यांना शिकण्याची इच्छा असून सुध्दा घराच्या गरीब परिस्थिती मुळे शिकता येत नाही अश्या मुलांसाठी बी. एल. मानकर. बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दर वर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून संस्थेने ह्या वर्षी पुणे शहरा पासून ८० किमी लांब दुर्गम भागात असलेले गाव पांगारी ता. भोर जिल्हा पुणे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत हा उपक्रम गुरुवार दि. २१/७/२२ रोजी सकाळी १० ते १ ह्या वेळेत केला.ह्यावेळी विद्यार्थ्याना वही-पुस्तके व शालेय सामान वाटण्यात आले. तसेच ह्या सोबत मोफत आरोग्य शिबिर,दंतरोग तपासणी तसेच दातांची निगा कशी राखावी या बद्दलचे मार्गदर्शन डाॅ.मेहता यांनी केले.व्यसनमुक्ती या बद्दल डाॅ.दिपाली वाघ यांनी मार्गदर्शन केले.तसेच मुलींचे आरोग्य या बद्दल डाॅ.वर्षा मानकर यांनी मार्गदर्शन केले. ह्या शिबिरामध्ये सर्व कक्षांचे मिळून १५० विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ह्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरवसे सर व जयश्री सणस ‍मॅडम ,दिनकर सर ,कवटे मॅडम, चिकणे सर, गवारी सर, कांबळे मॅडम, मगर मॅडम, तसेच बी एल मानकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाळासाहेब मानकर ,डॉ. वर्षा मानकर ,डॉ दीपाली वाघ डॉ सिद्धार्थ मेहता ,डॉक्टर यादवी, कल्याणकर, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. स्वप्नील जगताप, श्री. सचिन मानकर हे उपस्थित होते.