अनिल चौधरी, पुणे
कोंढवा येथील श्री नरवीर तानाजी मालुसरे चौकात असणाऱ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणाला मोठे भगदाड पडले होते यावेळी तेथून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सागर लोणकर हे जात होते , त्यांनी हे पाहताच याठिकाणी येथे कुठल्याही वाहनचालक आणि पादचाऱ्याचे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या मोठ्या खड्ड्याच्या आजू बाजूला दगडे लावून नागरिकांना सावध केले त्यांच्या सतकर्तेमुळे येथे होणारे मोठे अपघात टळला आहे .त्याच बरोबर पुणे मनपा प्रशासनास याची माहिती देऊन ह्या ड्रेनेजच्या झाकणाचे दुरुस्तीचे काम त्वरित करून घेतले आहे. यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
याबाबत सागर लोणकर यांच्याशी संपर्क केला असता , मी माझ्या वैयक्तीक कामासाठी येथून जात असताना मला मोठा खडडा पडलेला दिसला त्याप्रमाणे एका जाबाबदार नागरिक म्हणून हे सर्व केले. त्याच बरोबर याबाबतची माहिती पुणे मनपा प्रशासनास कळवून हे ड्रेनेजचे झाकण त्वरित बदलून घेतले , प्रसंगी आंदोलनाचा पावित्रा घेतला.
वास्तविक लोणकर यांच्याप्रामणे समाजातील सर्व नागरिकांनी आपले जबाबदारीचे भान ठेवून आपल्या आजू बाजूला होत असलेल्या घटनांचे त्या त्या विभागाच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून कामे मार्गी लावावीत. सागर लोणकर हे नेहमीच नागरिकांच्या सेवेस तत्पर असतात . त्यांनी अनेक वेळा रस्ते , पाणी, वीज आणि इतर समस्येविरोधात आवाज उठवून नागरिकांना मदत करत आहेत.