Wednesday, February 19, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेस्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य...

स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपोत रूपांतर : पोलीस कर्मचारी व कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात

पुणे शहर कचरा पेटी(कंटेनर)मुक्त तर पोलीस वसाहतीत कचरा व पेट्यांचा खच

पुणे प्रतिनिधी,

पुणे महापालिकेकडून पुणे शहर कचरा पेटी मुक्त करण्याच्या प्रयत्नात स्वारगेट पोलीस वसाहतीचे कचरा डेपो मध्ये रूपांतर केल्याचे दिसून येत आहे.पुणे महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कचऱ्याचा साठा करताना दिसत आहेत.

स्वारगेट परिसरातील हॉटेल,भाजी मंडई येथील सडलेला कचरा या ठिकाणी आणून ठेवला जात असून मोठ्या प्रमाणात साठा केला जात आहे हा कचरा गोळा करण्यासाठी तसेच त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी पुणे महापालिका कर्मचारी पैसे देखील घेत असल्याचे दिसून येत आहेत हे पैसे घेऊन हा कचरा पोलीस वसाहतीत टाकला जात आहे.
दोन ते चार दिवस या पेट्या(कंटेनर) उचल्या जात देखील नाहीत त्यामुळे कॉलनीतील पोलीस कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच डेंगू,मलेरिया व साथीच्या रोगांनी कर्मचारी व कुटुंबीय त्रस्त झाले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य,दुर्गंधी पसरली आहे.यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या देखील वाढली असून,काही पोलीस कर्मचारी तसेच लहान मुलांना या भटक्या कुत्र्यांनी चावा देखील घेतला आहे.गेल्या काही महिन्यांन पासून हा सर्व प्रकार येथे चालू असून अनेक पोलीस कर्मचारी या त्रासाला कंटाळून पोलीस वसाहत सोडून गेल्याचे देखील दिसून येत आहे.12 तास ड्युटी करून आलेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला या सर्व त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.

संबंधित प्रशासन,महापालिका कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली असता परिसरातील नगरसेवकांची नावे सांगितली जात असून जर तुम्ही तक्रार केली तर पोलीस वसाहतीतील कचरा उचला जाणार नाही असे सांगण्यात येत आहे.स्वारगेट पोलीस वसाहत ही खडक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येत,पोलीस स्टेशन येथून दूर असल्याने संबंधित प्रशासन या गोष्टींची दखल घेत नाही तसेच हा परिसर PWD यांच्या व्यवस्थापना अंतर्गत येतो दोन्ही प्रशासन एकमेकांकडे बोटे दाखवून टाळाटाळ करण्यात व्यस्त आहेत.

संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यावर उपाय योजना करावी अशी मागणी पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचारी व कुटुंबियांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!